आणखीकोकणरत्नागिरी

भाजप चिपळूणतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन विविध ठिकाणी साजरा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. २२ येथील भाजपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन कौंढरताम्हणे वालोटी व कुंभार्ली येथे तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. योग शिक्षक सुधाकर शिंदे यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली.

भाजपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार सोमवारी येथील भाजपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्‍कर, मुंबई कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर इंदुलकर, माजी प्राथमिक शिक्षक सदानंद भागवत, शक्तीकेंद्र प्रमुख समीर इंदुलकर, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश भोबस्कर, गणेश खेतले, सिद्धू जाधव, राकेश डांगले, संदेश आग्रे, सुभाष आयरे, दिनेश पागरे, सुमित दणदणे, संकेत वीर, कृष्णा जाधव, गणेश जाधव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!