आणखीकोकणरत्नागिरी

खासदार विनायक राऊत व आमदार भास्कर जाधवांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना मुबलक खत मिळणार – उमेश खताते

🛑वाशिष्ठी कृषक सहकारी संस्था याठिकाणी युवसैनिकांनी घेतली भेट

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. २२ चिपळूण शहरातील काविळतळी येथे वाशिष्ठी कृषक सहकारी संस्था अंतर्गत २१ गावे येतात.त्या गावातील शेतकऱ्यांना गेली ७ ते ८ दिवस झाले खत उपलब्ध होत नाहि.याठिकाणी दररोज शेतकरी येतात पण खत उपलब्ध होत नाहि.आता वेळेला खत मिळाले नाही तर शेती करून काहीही उपयोग होणार नाही.यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते यामुळे सोमवारी २१ गावातील ५० ते ६० शेतकरी याठिकाणी येऊन वाद घालून गेले.ही बाब युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांना समजताच थेट सदर संस्था गाठली.सोबत उपशहर प्रमुख भय्या कदम,युवासेना तालुका सचिव प्रतिक शिंदे,राहुल भोसले,शुभम चिपळूनणकर,निलेश शिगवण आदि शिवसैनिक व १५ ते २० शेतकरी सोबत घेऊन चेअरमन दादा बैकर यांची भेट सदर विषयावर सविस्तर चर्चा केली असता सदर संस्थाने २५० टन खताची आँर्डर देलेली असतांना आता पर्यात फक्त ४५ टन खत उपलब्ध झालेले आहे.वरूनच खत उपलब्ध होत नाहि तरी वरिष्ठाच्या कानावर घालत सदर विषय मार्गा लावता येईल असे चेअरमन दादा बैकर यांनी खताते यांना सांगितले

खासदार विनायक राऊतांनी सोडवली अडचण

यानंतर उमेश खताते यांनी थेट खासदार श्री.विनायक राऊत व आमदार श्री.भास्करशेठ जाधव यांच्याकडे फोन करून विषय कळविला.त्यावेळी खासदार विनायक राउत यांनी लगेच कृषीमंञी दादा भूसे व आरसीइएफ या खत कंपनीचे प्रवीण शहाकर यांच्या जवळ संपर्क करुन सदर संस्थेला आँर्डर नुसार खत उपलब्ध देण्याचे आश्वासन दिले.यामुळे चिपळूण मधील शेतकऱ्यांना मागणीनुसार खत मिळण्यास मदत होणार असल्याचे खताते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!