पुण्यात आठवडाभर पावसाचा इशारा
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी: सुर्यकांत जाधव
🎴पुणे: दि २०:पुणे शहरात शुक्रवारच्या (ता १८) तुलनेत शनिवार कमी पाऊस पडला. सकाळी काही प्रमाणात पाऊस उघडला होता. परंतु ढगाळ वातावरण कायम होते. मात्र, दुपारनंतर शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम सरी पडल्या.
शहर आणि परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता. मात्र शनिवारी (ता. १९) तुलनेने कमी पाऊस होता. येत्या आठवडाभर शहर आणि परिसरात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात शनिवारी सकाळपर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. तर दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

