आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्ह्यातील काल झालेली राडा संस्कृती अशोभनीय , जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संयमाने वागा – बबन साळगावकर

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी – राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि. २० सिंधुदुर्ग जिल्ह्याने राडा संस्कृतीचा गेली अनेक वर्ष अनुभव घेतला आहे, त्यामुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन जिल्हा मागे गेला आहे व ही राडा संस्कृती या जिल्ह्याला परवडणारी नाही, या राडा संस्कृतीमधून कै श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश नाईक,या नेतेमंडळींचा बळी गेला आहे, त्यामुळे सर्वपक्षीय नेतेमंडळींशी संयमाने वागून कोरोना च्या महा मारी ने उपासाने मरणार्‍या जनतेसाठी काहीतरी योगदान द्यावे असे आवाहन सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बबन साळगावकर यांनी केले आहे.

कोरोना काळामध्ये गेले आठरा महिने समाजातील प्रत्येक नागरिक गोरगरीब जनता अनेक अडचणींना सामोरे जात आहे, प्रत्येक कुटुंबातील करते आप्तस्वकीय गमावलेले आहेत, काही कुटुंबे तर उद्ध्वस्त झाली आहेत, कालच मालवणची बातमी वाचल्यानंतर मन अस्वस्थ झालं अशा प्रकारच्या अनेक घटना जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये घडलेल्या आहेत,इन्सुली येथील तसेच चराटा येथील तसेच अनेकांना भागांमध्ये मुलानी पालक गमावलेले आहेत, व्यापारी कष्टकरी शेतकरी कुटुंब सावरण्यासाठी प्रयत्न करत असताना करोना ने जिल्ह्यामध्ये कोणी ना कोणी आपला जीव गमवला आहे,अनेक तरुण बेरोजगार झालेत, रोजीरोटी कशी चालावी या विवंचनेने मध्ये सर्वसामान्य आहेत मध्यमवर्गीयांची परिस्थिती याहीपेक्षा भयानक आहे, करोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकत नाही हे राष्ट्रीय संकट असूनही संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण भारत एकत्र येऊन काम केलं असं कधी दिसलं नाही, प्रत्येक जण पक्षा पक्षांमध्ये वाटले गेले आहेत, प्रत्येकाला सत्ता हवी आहे सत्तेच्या नादात गरिबांचा विचार करायला कुणाला वेळ नाही, सर्वच पक्षांची आंदोलने खुलेआम चालू आहेत निर्बंध आहेत ते व्यापाऱ्याला रस्त्यावरती चालणाऱ्या नागरिकांना कष्टकरी लोकांना निर्बंध घातले जात आहेत, होणारी पक्षीय आंदोलन रोखण्याचं धाडस कुठच्या सरकारमध्ये नाही अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे असा आरोप साळगावकर यांनी केला आहे.

जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सुविधांचा अभाव करोना पिडीत रुग्णांना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे कित्येक कुटुंबांनी आपल्या भविष्यासाठी ठेवलेली रक्कम या आजारांमध्ये संपवली आहे एवढं करू नये रुग्ण पुन्हा बरा होऊन घरी येईल याची खात्री नाही, यात अनेक रुग्ण गेले आहेत, सक्षम वैद्यकीय सुविधा निर्माण राजकीय पदाधिकारी करू शकले नाहीत हे अपयश आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

रोजगार आणि व्यवसाय             

जिल्ह्यातील तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ,जिल्ह्यामध्ये एकही इंडस्ट्री नाही कि ती तरुणांना नोकऱ्या देऊ शकेल ,नोकरीनिमित्त येथील तरुण पुणा,मुंबई-,गोवा, हैदराबाद , बेळगाव ,तत्सम मोठ्या शहरांमधून गावाकडे आलेले आहेत आपल्या कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा याच्यावरती कुठं चा राजकीय पक्षांकडे कार्यक्रम नाही.

यापूर्वीच्या राडाच संस्कृतीने जिल्ह्याने बघितली आहे ,यामध्ये सत्यविजय भिसे श्रीधर नाईक, गोवेकर, अंकुश राणे ,सारखे राजकीय कार्यकर्ते गमावले आहेत आता राडाच संस्कृती जिल्ह्याला परवडणारी नाही वेळी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बसून सुवर्णमध्य काढावा, तसेच वैद्यकीय सुविधा मजबूत करणे तरुणांना नोकऱ्या कशा उपलब्ध होतील हे पाहणे करोला मुळे गमावलेल्या प्रत्येक कुटुंबातील प्रमुखांना शासकीय सेवेमध्ये कस सामावून घेता येईल याकडे लक्ष द्या.

आव्हाने आणि प्रतिआव्हान एक थांबवा या लोकांना देणेघेणे नाही तुमच्या आव्हान-प्रतिआव्हान जिल्ह्यात वाढत आहे याचे भान ठेवा. असे आवाहन माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बबन साळगावकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!