सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक १०० मि.मी. पाऊस
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी : दि. २० (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 66 पूर्णांक 4 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 908.13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 95(1031), सावंतवाडी – 100(1083.7), वेंगुर्ला – 48.2(711.4), कुडाळ – 60(795), मालवण – 45(881), कणकवली – 65(998), देवगड – 38(777), वैभववाडी – 80(988), असा पाऊस झाला आहे.

