कृषी सहाय्यक वसंत भुरे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार न भूतो न भविष्यती..
_*🛑 कृषी सहाय्यक वसंत भुरे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार न भूतो न भविष्यती..*_
_*🛑 अलिबाग तालुक्यातील कुटकोळी पोस्टमधील तळवली गणेश मंदिरात झाला सत्काराचा भव्य कार्यक्रम..*_
_*🛑 अनेक मान्यवरांनी केला वसंत भुरे यांच्या कृषी खात्यातील कार्याचा सन्मान..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴अलिबाग, दि-१८ :-* अलिबाग तालुक्यातील पोस्ट सुडकोली तळवली गावातून सिंधुदुर्गात येऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवून ग्रामीण भागात हरितक्रांती घडविणारे कृषी सहाय्यक वसंत हिराजी भुरे यांनी सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे तसेच सांगेली वेर्ले गावात १००% फलोत्पादन योजनेतून गावात हरित क्रांती घडवली.. जवळजवळ चौदा वर्षे त्यांनी, सिंधुदुर्गात आपल्या कार्याचा ठसा मधून आपल्या मूळ गावी बदली होऊन गेले, त्याठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या,अतीवृष्टी असेल, वादळ असेल, शेतकऱ्यांना १००टक्के नुकसान भरपाई मिळवून दिली. त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम न भुतो न भविष्यती असा झाला, तळवली येथील गणेश मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
कृषी सहाय्यक म्हणून भरती झाल्यावर सिंधुदुर्गात रुजू झालेले वसंत भुरे यांनी प्रत्येक गावात शासकीय योजना पोहोचवली, बंधारे बांधले ,पुराने असेल वादळाने असेल शेतकऱ्यांना १००टक्के मोबदला देण्याचा प्रयत्न केला, क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ, त्यामुळे अनेक मंडळांशी ते जोडले गेले, जो मिळेल त्याला आपलेसे करायचे हा त्यांचा स्वभाव, त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात त्यांनी आपला मित्र परिवार जोडला,बिरोडकर टेंब परिसरात ते जवळपास तेरा वर्षे राहिलेत,शिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाचे ते आधारस्तंभ होते, त्यांच्या बदलीच्या वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वसंत भुरे आपल्या मूळ गावी जाणार या विचाराने अनेकांचे डोळे पाणावलेत,
सिंधुदुर्गातून अलिबाग मध्ये गेल्यावर ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमठवला, म्हणूनच निरोप समारंभाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा झाला असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात बोलताना स्पष्ट केले.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला प्रदीप बैनाडे तालुका कृषी अधिकारी अलिबाग,एस ए, पाटील मंडळ कृषी अधिकारी अलिबाग, रायगड जिल्हा कृषी विभाग कर्मचारी, श्री डी,जे, गायकर अध्यक्ष गणेश सेवा मंडळ तळवली, गणेश भुरे अध्यक्ष गणेश सेवा मंडळ मुंबई ,सौ पण प्रिती तांबटकर सरपंच ग्रामपंचायत कोळी, विक्रांत वार्डे अलिबाग तालुका युवा पुढारी शेतकरी कामगार पक्ष, अनंत पाटील सूडकोली, दत्ताराम भोईर नवखार, सदानंद शिंगाडे कुछ, प्रदीप खोत ,धोंडेखोर, संदेश वावकर भागडवाडी सदस्य ग्रामपंचायत सुडकोळी, अनिल शेळके उपसरपंच ग्रामपंचायत सुडकोळी, अंकुश धरत वरंडे, संतोष धरक बनवली, वसंत भुरे यांच्या सौ वैशाली भुरे ,मुलगी वर्षा भुरे, मुलगा अनिकेत भुरे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.