🛑 मुंबई-गोवा महामार्गावर प्रवासी शेडचे काम अर्धवट स्थितीत..
🛑 ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधवांना होतो त्रास..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१८ :- मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस सिंधुदुर्ग जिजामाता आरोग्य केंद्राजवळ स्टॉप जवळील प्रवासी शेड चे काम अर्धवट स्थितीत असून या प्रवासी शेड चा उपयोग प्रवाशांसाठी होत नाही. त्यामुळे मुसळधार पावसात प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. महामार्ग व प्रवासी शेड यामधील जागेत येथे खडी व दगड या ठिकाणी प्रवासी शेडचे कामासाठी टाकले होते मात्र शेडचे काम झाले तरी याच ठिकाणी आहेत महामार्ग व प्रवासी शेड मधील लेवलचे काम अद्याप करण्यात आले नाही ज्येष्ठ नागरिक व अपंग बांधवांना या प्रवासी शेडचा उपयोग करता येत नाही. याठिकाणी पाणी साठून चिकल होत असलेने प्रवाशांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या प्रवासी शेड वर थांब्याचे नाव दिलेले नाही ते देण्यात यावे अशी मागणी वाहन चालक व प्रवासी व नागरिकांमधून केली जात आहे.

