🛑 कुंदे कुसबे पोखरण आंब्रड गावात बीएसएनएलचा खेळखंडोबा..
🛑 बीएसएनएलचा टॉवर असूनही गेले पाच दिवस नेटवर्क गायब..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१८ :- कुडाळ तालुक्यातील कुंदे कुसबे पोखरण आंब्रड गावातील पाच दिवस बीएसएनएल ते नेटवर्क गायब आहे. त्यामुळे गावात शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार तक्रार करू नये बीएसएनएल कडून कोणतेही ही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर गावातील काही वाडीमध्ये कधीच रेंज येत नसल्याचे या वाडीतील शाळेतील मुलांना ऑनलाईन अभ्यास करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे आता अभ्यास कसा करावा हा प्रश्न मुलांनसमोर निर्माण झाला आहे.या बीएसएनएल कंपनी शिवाय दुसरा कोणताही टावर नसल्याने दुसरी कोणतेही रेंज येत येत नाही त्यामुळे नागरिक आता आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत .

