🛑 कोरोना काळात देवदूता सारखे काम करणाऱ्या प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या बदलीस स्थगिती द्यावी..
🛑 सर्वपक्षीय नेतेमंडळी व सामाजिक संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-१८ :- सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कोरोना काळ, तोक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्ये झोकून देत रात्रंदिवस काम केले. याची दखल घेऊन त्यांची शासकीय निकषानुसार होणारी बदली स्थगित करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. एका वर्षाची मुदतवाढ देत जिल्हातून कोरोना हद्दपार झाल्यानंतर बदली बाबत विचार करावा. याबाबतचे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आले आहे. तर त्या ई-मेलला या मागणीबाबत सकारात्मक विचार करणार असल्याची प्रतिक्रिया आली आहे. विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी शेतकरी बांधवांचा माध्यमातून यासाठी पुढाकार घेतला. याला सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षियांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेवक बाबु कुडतरकर, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी, कॉग्रेस उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, मराठा समाज तालुका अध्यक्ष सीताराम गावडे, कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, माजी सभापती यशवंत परब, तुळस सरपंच शंकर घाटे आदींनी पाठिंबा दिलाय.

