🛑 परुळे येथे विधवा महिलेच्या घरावर झाड कोसळून नुकसान..
🛑 युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर यांनी घटना स्थळी धाव घेऊन केले मदत कार्य..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले, दि-१७ :- गेले तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावूस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परुळे गौतमनगर येथील रहिवाशी विभा विजय परुळेकर या गरीब विधवा महिलेच्या घरावर सागाच झाड पडून घराचं नुकसान झाले आहे. ही बाब युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर यांना समजताच तातडीने त्यानी तिकडे धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला केले तसेच त्या महिलेला ताडपत्री देऊन मदत केली.
यावेळी ग्रामसेवक शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण उपस्थित होते.

