🛑 सोनाळी येथे लसीकरण केंद्राचा पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-१७ :- सोनाळी येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते पार पडला. गावातील ग्रामपंचायत कार्यालयात हे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. लसीकरण केंद्र सुरू झाल्याने याचा फायदा सोनाळीसह कुंभवडे येथील ग्रामस्थांना होणार आहे.
शुभारंभ प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, आरोग्य विस्तार अधिकारी आनंद चव्हाण, सोनाळी सरपंच भिमराव भोसले, प्रमोद सावंत, राजेंद्र रावराणे, ग्रामसेवक गजानन कोलते व ग्रामस्थ उपस्थित होते.

