मुसळधार पावसामुळे दोडामार्ग शहरात पाणीच पाणी..
_*🛑 मुसळधार पावसामुळे दोडामार्ग शहरात पाणीच पाणी..*_
_*🛑 गुढगाभर पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची तारांबळ..*_
_*🛑 दरवर्षी होणाऱ्या या गैरसोयीवर कायमस्वरुपी इलाज करण्याची नागरीकांची मागणी..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१४ :-* काल रात्री पासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे दोडामार्ग शहरातील रस्त्यावर तलावाचे चित्र दिसु लागले होते.
दोडामार्ग गणपती मंदिरापासुन ते बँक ऑफ महाराष्ट्र व त्यापुढिल रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहन चालकांना त्यातुन वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती.
दरवर्षी होणाऱ्या या गैरसोयीवर कायमस्वरुपी इलाज करून नागरीकांना सुखाचा प्रवास करण्यास द्यावा अशी मागणी नागरीकां मधुन होत आहे.

