पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!
🛑 सोमवारपासुन दुकाने व मॉल्स संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव
🎴पुणे : दि. ११ पुणे शहरात ४ जुन ते १० जुन या दरम्यान कोरोनाबाधितांचा सरासरी दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने शहरातील निर्बंध शिथिल करण्याबाबत आज अजितदादा पवार यांनी सकाळच्या सत्रात आढावा बैठक घेतली.
सोमवारपासुन दुकाने व मॉल्स संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच रेस्टॉरंट १० वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे.
अभ्यासिका वाचनालय देखील सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः लाईव्ह येऊन सांगितले आहे.

