आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी प्रांताधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद – खासदार विनायक राऊत

🛑 व्हाट्सअपच्या माध्यमातून मित्रमंडळींना आवाहन करून गोरगरीब जनतेला केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी :- प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि- -:

सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून मित्रमंडळी ला केलेले आवहनातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे गृहोपयोगी वस्तूंचे तालुक्यातील एकशे पंचवीस कुटुंबाना वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी प्रांत कार्यालयाला भेट दिल्यानंतर बोलताना काढले

सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून मित्र मंडळींना समाजातील अत्यंत गरीब कुटुंबांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले होते, त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला, सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या वस्तू त्या पैशातून खरेदी करण्यात आल्यात,याची पाहणी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी केली.प्रांत विभागाचे कर्मचाऱ्यांनी एका कुटुंबाला आठ दिवस पुरतील अशा स्वरूपाचे अन्नधान्य चे पंधरा वस्तूंचे किट तयार केले आहे,त्याचे वितरण त्यांच्या कर्मचाऱ्यांना मार्फत अत्यंत गरीब कुटुंबांना करण्यात येणार आहे व त्याचे सर्वेक्षण ही पूर्ण करण्यात आले आहे.

पहिल्या लाॅक डाऊन मध्ये समाजातील गरजू लोकांना सर्वतोपरी मदतीचे हात उभे राहिलेत मात्र दुसऱ्या लाॅक डाऊन मध्ये अशा प्रकारची मदत मिळाली नाही, त्यामुळे खरोखरच गरज कुटुंब आर्थिक विवंचनेत जगत असताना अशा प्रकारची मदत होणे ईश्वरी काम असल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले व आपणही या उपक्रमाला मदत दिली.

तर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी मदतीचा ओघ असाच सुरू राहिला तर वाटपाचे सत्र असेच सुरू राहिल असे स्पष्ट करून आपल्या कार्यालयाचे कर्मचारी तसेच दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून हे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले ,आपल्या डोक्यात सदरची कल्पना आल्यावर ही व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून आपण मित्रांसमोर मांडली अनेक दानशूर मित्रांनी सहकार्य केले त्यात प्रमोद पाटील अप्पर सचिव मंत्रालय मुंबई, श्रीहरी पारगावकर मुख्य प्रबंधक युको बॅक सुरत,सचिन पाटील संचालक ओरीयंट इंडिया प्रा लिमिटेड,बाबू कुडतरकर, नगरसेवक सावंतवाडी,मनोज निंबाळकर तलाठी तसेच निशा पवार,मधूसुदन कुडतरकर,राजेंद्र चव्हाण,अनुजा भास्कर,वसंत गायकवाड, प्रकाश फाले,दत्तात्रय परुळेकर,वर्षा कावले,मनिषा भोवर,गौतमी नाईक, शशांक नार्वेकर,रोहन पाटील, तहसीलदार राजाराम म्हात्रे या सर्वांमुळे आपण हे काम करु शकलो असे स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जि प सदस्य राजन मुळीक, तहसीलदार राजाराम म्हात्रे ,शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर, खासदार विनायक राऊत यांची कन्या रुची राऊत, डॉक्टर प्रवीण ठाकरे, एडवोकेट शाम सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या उपक्रमाला मदत करणार्‍यांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आभार पत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!