कृषिकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 साटेली- भेडशी मध्ये शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन..

 

🛑 तालुका कृषी अधिकारी श्रीमती.शेटे मॅडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०७ :- सध्या भात पेरणीस मोठ्या प्रमाणावर सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज साटेली – भेडशीतिल शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागा मार्फत कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भात बियाणे बिजप्रक्रिया , बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, १०% रासायनिक खताची बचत, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खतांचा वापर, सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर, कृषक ॲप या सर्व गोष्टीं विषयी तालुका कृषी अधिकारी श्रीमती.शेटे मॅडम यांनी सविस्तर माहिती देवून या सर्व गोष्टींबाबत मार्गदर्शन केले.

तसेच भाताच्या सुधारित, संकरित व स्थानिक वाणाची माहिती , जैविक खाते, सेंद्रीय खते, हिरवळीचे खते यांची सविस्तर माहिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन साटेली – भेडशी कृषी सेवक साईराम शिंदे यांनी केले.

यावेळी कोनाळ कृषी सेवक संतोष माघाडे तसेच जयसिंग राणे, कृष्णा धर्णे, नागेश धर्णे, सशांक राणे, प्रभाकर राणे, मिथुन धर्णे आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!