🛑 कास गावात BSNL चा टॉवर असूनही गावात काही वाड्यावर नेटवर्क नाही..
🛑 अर्ज करूनही एक वर्ष उलटले अद्यापही न्याय नाही..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : अजय भाईप
🎴कास, दि-०७ :- येथील गावामध्ये कित्येक वर्षा पासून BSNL या कंपनीचा टॉवर उभारण्यात आला असून. ह्या टॉवरची रेंज गावातील काही वाड्यावर मिळते तर काही वाड्यावर मिळतच नाही. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कास गावात रेंज नसल्याची तक्रार अर्ज करण्यात आला होता परंतु आजपर्यंत या अर्जाचा पाठपुरावा अद्याप करण्यात आला नाही. त्यामुळे गावात काही वाड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे.

