कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑 नानाभाऊ पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त माणगांव मध्ये करण्यात आले वृक्षारोपण..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴कुडाळ, दि-०५ :- नानाभाऊ पटोलेच्या वाढदिवसा निमित्त कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माणगांव मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कुडाळ तालुका महिला अध्यक्ष कु. सुंदरवल्ली कन्नूस्वामी पडीयाची, युवा काँग्रेस तर्फे गोविंद कुभांर तसेच या वेळी वन विभाग माणगांवचे परी मडंल अधिकारी सुनील सावंत, वन अधिकारी सुनील भंडारे, तसेच बाळराजे जगताप कालेली, यांच्या वतीने परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शासकिय योजना,वृक्ष सवंधन, जगली प्राणी कायदा, याच मार्गादशन करण्यात आले. या मध्ये सुपारी, काजु, आंबा, फणस, व फुलझाडे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना सद्या कोरोना महामारी विषयावर जन जागृती करण्यात आली. यावेळी महिला बचत गट व सौ.स्मिता कुभांर,संदीप परशुराम धुरी, सौ. प्रतिभा कडव,सुदर्शन कुभांर, सौ. सुरेखा बांदेकर याच सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!