🛑 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बांदा वन परिमंडळच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०५ :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बांदा वन परिमंडळच्या वतीने शनिवारी सकाळपासून विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तांबुळी येथील ऐतिहासिक वन बागेतील एक हेक्टर क्षेत्रात फणस, आंबा, शिवन, कोकम, भेलद्या माड या झाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. तसेच दुर्मिळ अशा बेल, सुरंगी, धूप रोपे या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी वन विभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, बांदा वनविभागाचे वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक संतोष गोजारे, शिंदे, मोरे, ग्रामपंचायत सदस्य बाबली सावंत, आदी ग्रामस्थांसह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. या वृक्षारोपन कार्यक्रमात स्थानिक महिलांचा चा उत्फुर्त सहभाग घेतला.

