आरोग्य

RTPCR टेस्टचा रिपोर्ट पाहता येणार फक्त एका क्लिक वर

*RTPCR रिपोर्ट पाहता येणार एका क्लिकवर*
सावंतवाडी: RTPCR टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पाहणे नागरिकांसाठी गैरसोयीचे होत होते व रीपोर्ट मिळण्यासाठी विलंब देखील होत होता परंतू “वी फाॅर यू” संस्थेतर्फे बनविण्यात आलेल्या
https://reportsindhudurg.com या वेबसाइट द्वारे नागरिकांना RTPCR रीपोर्ट एका क्लिक द्वारे पाहता येणार आहे.तसेच प्रत्येक रुग्णाला या संदर्भात माहिती SMS द्वारे पाठविली जाते. या प्रणालीची निर्मिती “वी फाॅर यू” संस्थेचे आय टी हेड देवेंद्र हळदणकर यांनी केली असून ही प्रणाली प्रशासनाकडे विनामोबदला सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीम. के मंजूलक्ष्मी, जि.प.सी.ई.ओ. श्री प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली असून याचा प्रत्यक्ष वापरही जिल्हा प्रशासनाने चालू केला आहे. ही प्रणाली 31 मे 2021 पासून कार्यान्वित झाली असून 31 मे नंतर RTPCR टेस्ट केलेल्या सर्व नागरिकांना आपला रिझल्ट या वेबसाईटवर पाहता येणार आहे व यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात होणारी गैरसोय थांबणार आहे. “वी फाॅर यू” संस्था अजून एका उपक्रमावर काम करत असून यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे, इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन ‘”वी फाॅर यू” संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!