नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस ५ जून रोजी ‘शेतकरी सन्मान दिवस’ म्हणून करणार साजरा
*सावंतवाडी दि.०१-:* नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस ५ जून रोजी ‘शेतकरी सन्मान दिवस’ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हात साजरा करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली.
बाळा गावडे म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांचा जन्म एका गरिब शेतकरी कुटुंबात झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्व व लोकांच्या पाठिंब्यावर ते राजकारणात मोठ्या पदापर्यंत पोहचले. आमदार, खासदार, विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सतत शेतकरी, कष्टकऱ्यांच्या कल्याणावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला. शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आपल्याच सरकारशी दोन हात करण्यात त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. नरेंद्र मोदी यांच्या जुलमी राजवटीत शेतकऱ्यांचा अतोनात होत असलेला छळ त्यांना पहावला गेला नाही. अच्छे दिन चे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून फसवल गेल आहे, शेतकऱ्यांना त्यांच्याकडून न्याय मिळेल याची काहीही शास्वती राहिलेली नाही हे नानाभाऊंच्या लक्षात येताच त्यांनी आपली राजकीय कारकिर्द डावावर लावून भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला.
ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या पुढे कोणाचीही बोलण्याची हिम्मत होत नव्हती त्यावेळी शेतकरी व ओबीसींच्या मुद्यावरून मोदींसोबत पंगा घेतला. प्रसंगी त्यांच्या हिटलरशाही भूमिकेचा निषेध करत नानाभाऊंनी सत्तेतल्या खासदारकीला ठोकर मारली. विधानसभेचे अध्यक्षपद भूषवितानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रामुख्याने प्राधान्य दिले. मोहाफुल’ प्रश्नीही आदिवासींना न्याय मिळवून दिला. शेती व शेतकऱ्यांप्रती तळमळीने काम करणाऱ्या नानाभाऊंचा ५ जून रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी सन्मान दिवस’ म्हणून साजरा करणार आणि आपल्या शेतकरी नेत्याला खऱ्या अर्थाने वाढदिवसाची हीच खरी भेट देऊ.

