कोकणची लोककला, दशावतार सादर करण्याची परवानगी द्या; आम. नितेश राणेंची मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी
शेकडा कुटुंबे उपजीविकेसाठी दशावतार नाट्यकलेवर अवलंबून; आम. राणेंनी वस्तुस्थितीचे केले कथन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०८: कोकणची लोककला असलेला दशावतार सादर करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या कडे केली आहे. दशावतार कला हे येथील जनतेचे सांस्कृतिक अंग आहे.या दशावतार कलेवर उपजीविका असणारे अनेक कलाकार आणि त्यांची कुटुंबे आहेत. शेकडो दशावतार नाट्य मंडळे, सिंधुदुर्ग जिल्हयात कार्यरत आहेत. त्यांना दशावतारी कला नाट्यरूपाने सादर करण्याची परवानगी द्या व कलाकारांवर कोरोना काळात आलेले संकट दूर करा असे आमदार नितेश राणे यांनी पत्रात लिहिले आहे.
सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे.त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. कला क्षेत्र ठप्प झालेले आहे. त्याची झळ कोकणाची पारंपरिक कला असलेल्या दशावतार कलेला सुद्धा पोहचलेली आहे. मार्च २०२० पासून आज मितीपर्यंत हा व्यवसाय (कला सादरीकरण) पूर्णपणे बंद आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे ९ ० ते १०० दशावतार नाट्यमंडळे आहेत . एका मंडळात कमीत कमी २० कलाकारांचा समावेश असतो . आज जवळ जवळ २०० कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. एकूण कलाकारांपैकी ८० टकक कलाकारांचे उपजीविकेचे साधन दशावतार कला हेच आहे. कोरोना लॉकडाऊन काळात मार्च ते मे हा ९० दिवसाच्या कालावधीत हा कला व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. त्याची झळ सर्वच नाटक कंपन्या, मंडळाच्या मालकांना व कलाकारांना पोहचली आहे . त्यांना या कले व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपजीविकेचा पर्याय नसल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .
आज बरेच व्यवसायांना छोट्या-मोठ्या प्रमाणावर शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आता नरात्रोत्सवापासून सुरु होणारा आमचा नाट्यकला सादरीकरणचा व्यवसाय सुरु होणार किंवा नाही. याबाबत मात्र सर्व मालक व कलाकार यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. व त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. दशावतार नाट्यप्रयोग सादरीकरणाच्या वेळी कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी खबरदारी घेण्यासाठी योग्य त्या नियम व अटी घालण्यात याव्यात परंतु त्यांना परवानगी देऊन त्यांचे उपजीविकेचे साधन सुरु करावे . तरी कोकणची लोककला असलेला दशावतार कलेचे कार्यक्रम (नाट्यप्रयोग) सुरु करणेबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी निवेदनातून केली आहे.
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_