कणकवली शहरात ३ दुकान मालकांवर भा.द.वि. कलम १८८ नुसार गुन्हे दाखल
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २९ शहरात नगरपंचायत आणि पोलिसांकडुन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच, ज्या दुकानदारांनी लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केला. अशा कणकवलीतल्या ३ दुकान मालकांवर भा.द.वि. कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये सुनीता शॉपिंग सेंटरचे अनिल घाडीगांवकर, ओमकार फुटवेअरचे शरद जाधव आणि शालेय पुस्तक भांडारचे विशाल हर्णे या तिघांवर भा.द.वि. कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली.
वारंवार सांगुन देखील अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त अनेक दुकाने उघडी असल्याप्रकरणी, कालच कणकवली शहरात ३० हजारांची दंडात्मक कारवाई केल्यानंतर, आज पुन्हा मुख्याधिकारी अवधुत तावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी शहरात सकाळी फेरफटका मारत अत्यावश्यकशिवाय सुरू असलेल्या दुकान मालकावर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईत पोलीस हवालदार कैलास इम्पाळ, नितिन बनसोडे, राकेश चव्हाण, वाहतुक पोलीस चंद्रकांत माने, अन्य पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते.

