आणखीसामाजिक

◾युवा मित्रमंडळ मळेवाड-कोंडुरे, आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र मळेवाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि.०२-:* युवा मित्रमंडळ मळेवाड-कोंडुरे, आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र मळेवाड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
कोरोना संक्रमण सुरू असून रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. यामुळे रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा करण्यासाठी सिंधू रक्त मित्र संघटना व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरात रक्तदान करण्यासाठी सहभागी व्हा असे आवाहनही करण्यात आले होते त्याला अनुसरून आज रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिर यावेळी डॉ विनायक पाटवे,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्राजक्ता रेडकर, अधिपारिचारिक मानसी बागेवाडी,सहाय्यक अनिल खाडे,सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी सचिव बाबली गवंडे, सहखजिनदार- सिद्धार्थ पराडकर, सदस्य संदीप चांदेकर, भिवसेन मसुरकर, शिक्षक- नितीन गवंडेळकर, अरुण तेरसे. पत्रकार- अभिजित गवस. प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाडचे आरोग्य सहाय्यक उमाजी राणे व सर्व कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश मुरकर युवा मित्रमंडळ मळेवाड कोंडुरेचे तेजस कदम, महेश कदम, सागर नाईक, स्वप्निल नाईक, दीपक नाईक, गौरेश नाईक, नारायण नाईक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!