आणखीआरोग्यकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

कणकवली शहरात १०७ रुग्णांची तपासणी, ९ पॉझिटिव्ह

🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २८ आज सकाळपासुन दुपारी १२.३० वाजेपर्यंत १०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ९ रुग्ण पॉझिटिव्ह भेटले आहेत.

कणकवली शहारातील आरोग्य पथकाचे चांगले काम दिसुन येत आहे. परंतु त्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन पुर्ण करतं नसल्याचे आढळुन आले आहे.

ऍम्बुलंन्स उपलब्ध नाही, १०८ वर कॉल केला की बाहेर गेले आहेत? भाड्यासाठी ऍम्बुलंन्स बाहेर गेली आहे? अशी कारणे सांगत असल्याचे निदर्शनास आले. मग कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण चालत हॉस्पिटलमध्ये किंवा घरी निघुन जातात.

पोलिस अधिकारी आणि होमगार्ड हे आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत नसल्याने, नागरिक आणि आरोग्य पथक यांच्यामध्ये भांडणं होते, नागरिक शिवीगाळ करतात, याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. एक होमगार्ड आणि एक पोलिस अधिकारी हे आरोग्य पथकासोबत कायम असणे गरजेचे आहे.

वारंवार आरोग्य पथककाने सांगुन देखील स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी कानाडोळा करत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला की, १५० रुग्णांची तपासणी दिवसभरात झालीच पाहिजे. मग ती आरोग्य पथकवाले कसे करणार? हेदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी बघणे गरजेचे आहे.

आरोग्य पथकाच म्हणणं ऐकुन घेतलं पाहिजे. आरोग्य पथकाच्या मागण्या पुर्ण करणे हे जिल्ह्याधिकाऱ्यांचे काम आहे. त्यांना होत असलेल्या गैरसोयी दुर केल्या, तरच ते अधिक जोशाने काम करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!