कणकवली शहरातील नगरपंचायत मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस अधिकारी, नगरपंचायत कर्मचारी यांनी ३ दुकानांवर केली धडक कारवाई

🛑अत्यावश्यक सेवा वगळता ठेवली होती दुकाने चालु

🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २८ आज सकाळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे, पोलिस अधिकारी आणि नगरपंचायत कर्मचारी यांनी ३ दुकानांवर कारवाई करत प्रत्येकी १०.०००/- रुपये एवढा दंड वसुल केला.

वारंवार सांगुन देखील कणकवली शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने चालु असल्याचे निदर्शनास आले. काल सर्वांना प्रांताधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या, तरीदेखील दुकाने चालु ठेवली.

राज मोबाईल, श्रीनाथ मोबाईल, गोल्डन वॉच कंपनी (घड्याळ दुकान) या ३ दुकानदारांना प्रत्येकी १०.०००/- रुपये दंड लावला आणि पुन्हा दुकान चालु दिसल्यास, दुकान सील करण्यात येणार आहे. एका कापड दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुख्याधिकारी, प्रांताधिकारी यांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियम पाळुन सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू करण्याची परवानगी असताना, या मोबाईल शॉपी मालकांनी नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कणकवलीत एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पो. नि. अजिरुद्दीन मुल्ला आणि नगरपंचायतीच्या या पथकात रवी महाडेश्वर, संतोष राणे उपस्थित होते.

यापुढे देखील दुकान व्यवसायिकांनी व नागरिकांनी कोरोना बाबतचे नियम न पाळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे मुख्याधिकारी अवधुत तावडे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!