आणखीआपत्कालीनकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

कणकवली तालुक्यातील करुळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आतिष सुभाषराव बर्वे यांचे दुःखद निधन

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २४ तालुक्यातील करूळ ग्रा. पं. चे ग्रामसेवक आतिष सुभाषराव बर्वे ( वय ३५, मुळ रा. शिरूर, बीड ) यांचे २३ मे रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले.

आतिष बर्वे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात मागील २० दिवसांपासुन उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत सालस स्वभावाचे आणि हसमुख चेहऱ्याच्या श्री. बर्वे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

श्री. बर्वे यांनी आपल्या नोकरीची सुरुवात कणकवली तालुक्यातील दिगवळे गावातुन केली होती. ६ वर्षे दिगवळे ग्रामसेवक पदी काम केल्यानंतर, मागील ३ वर्षांपासुन ते कणकवली करूळ गावचे ग्रामसेवक पदी कार्यरत होते.

आतिष बर्वे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षांचा मुलगा, ९ वर्षांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!