◾शैलेश लाड व मित्रमंडळाच्या वतीने शहरात सेवा बजाविणाऱ्या आरोग्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना आज सकाळी न्याहारी व पिण्याच्या पाण्याचे वाटप..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२४ :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शैलेश लाड व मित्रमंडळाच्या वतीने शहरात सेवा बजाविणाऱ्या आरोग्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना आज सकाळी न्याहारी व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. शैलेश लाड मित्रमंडळाने कोरोना कालावधीत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
लाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज १०० जणांना न्याहारीचे वाटप केले. यामध्ये अहोरात्र सेवा देणारे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शहरातील रस्त्यावर सेवा बजावणारे पोलीस कर्मचारी, बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले कर्मचारी, पत्रादेवी सीमेवरील पोलीस कर्मचारी, इन्सुली तपासणी नाक्यावरील कर्मचारी, बांदा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना नाश्ता व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. कोविड कालावधीत आरोग्य व पोलीस कर्मचारी दिवसरात्र सेवा बजावत आहेत, त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना नाश्ता व पाणी देण्याचा निर्णय घेतल्याचे शैलेश लाड यांनी सांगितले.
यावेळी शैलेश लाड, पत्रकार निलेश मोरजकर, राकेश परब, संजय भाईप आदी उपस्थित होते. लाड यांच्या दातृत्वाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व पोलीस प्रशासनाने यांनी आभार व्यक्त केले.

