कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी जेल अंतर्गत कोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी फरार..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि२४ :- सावंतवाडी जेल अंतर्गत कोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास खिडकीला चादर बांधून त्याने पळ काढला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. त्यानंतर तेथे ड्युटीवर असलेल्या ओरोस मुख्यालयांतर्गत पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून याबाबतची खबर जेल प्रशासनाकडून सावंतवाडी पोलिसांनाही देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावंतवाडी जेलमधील काही आरोपींना कोलगाव आयटीआय येथे जेल तयार करून तेथे ठेवण्यात आले होते. यातीलच हा आरोपी होता.

दरम्यान, प्रमोद मधुकर परब ( वय ५१ वर्षे ) असं या फरार आरोपीचं नाव असून त्याचा बांधा सडपातळ, वर्ण सावळा, अंगात लालसर रंगाचा त्यावर आडवे चॉकलेटी पट्टे असलेला हाफ टी शर्ट, चॉकलेटी कलरची हाफ पॅन्ट असा त्याचा पेहराव आहे. हा आयटीआय कोलगाव येथील जेल क्वारंटाईन सेंटर मधून पाहिल्या माळ्यावरून खिडकीचे ग्रिल उचकटून चादर ग्रिलला बांधून त्यावरून खाली उतरला. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास तो पळाला आहे. त्यामुळे सदर आरोपी कुणाला दिसून आल्यास सावंतवाडी पोलीस ठाणे फोन नं. 02363272066, 02363 272060 तसेचे मो.नं. 7350518994 या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!