आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावाला दिली बाळासाहेब पाटील यांनी भेट..

 

◾खेरवाडी येथील बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे ; सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीतर्फे मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-२४ :- महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री बाळासाहेब पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी केली. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील खेरवाडी येथील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच अलीकडे वस्ती व बंधाराच्या पलीकडे शेती अशा परिस्थितीमुळे बंधारा वाहून गेल्याने या बंधार्‍यावरून ये-जा करणाऱ्या लोकांचे व शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .या बंधारा शेजारील विहिरीतून तळवडे गावाला पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे तळवडे गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीतर्फे सन्माननीय मंत्रीमहोदयांकडे करण्यात आली . यांच्यासोबत आमदार दिपकभाई केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले , जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत , प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर , माजी जिल्हाध्यक्ष विक्टर डान्टस , सुनील भोगटे , बाळ कन्याळकर ,भास्कर परब, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर ,इफ्तिकार राजगुरू ,शफिक खान, राजू धारपवार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!