आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾हायवे प्रशासन करतेय डोळेझाक पण गाव होतय बदनाम..

 

◾आंबोलीतील पादचारी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीव वाचवण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत..

◾हायवे प्रशासन बनवत असलेला ब्रिज बनतोय अपघाताचा केंद्र बिंदू..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : चौडू पाटील

🎴आंबोली, दि-२३ :- सावंतवाडी बेळगाव हायवे रस्त्यावर आंबोली पासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर हे पुल बनत आहे, ह्या पुलावरती अनेक अपघात झाले आहेत या पुलावरून कितीतरी वाहने पुलाला कठडा नसल्याने खाली कोसळली आहेत.

काही वर्षापूर्वी याच ठिकाणी याच पुलावरून कठडा नसल्याने एक रिक्षा फुलावरून खाली कोसळून रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले होते, त्यानंतर झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले व नंतर कठडा बांधण्यात आला. दुर्दैवाने आजही तीच परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूचा कठाडा नसल्याने कित्येक वाहने खाली कोसळली आहेत त्यावर उपाय म्हणून हायवे प्रशासनाने रस्त्यावरती डांबराची खाली बॅरल लावली जणू काही दीपावलीला आकाश कंदील लावल्यासारखे.आधीच फुल अरुंद असल्याने व त्यावर बॅरल लावल्यामुळे रस्ता आणखीनच अरुंद बनला आहे. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या पादचार्‍यांना जिव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.

असे कित्येक बळी गेल्यावर व किती वर्षानंतर हायवे प्रशासन जागे होणार व पुलाला कठाडा बांधणार . असे ग्रामस्थांमधून बोलताना ऐकण्यात येत आहे.

राजा महाराजांचा वारसा लाभलेल्या व देवदेवतांचा इतिहास असलेल्या या आंबोली पुण्य भूमीत हायवे प्रशासन डोळेझाक पणा करीत असल्याने आंबोलीतील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!