◾निरवडे येथील रामचंद्र उर्फ सचिन दशरथ बाईत या युवकाचे ओरोस येथे उपचारादरम्यान निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि.२३ :- निरवडे येथील रामचंद्र उर्फ सचिन दशरथ बाईत (वय ३८) या युवकाचे ओरोस रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
आज पहाटे प्रकृती खालावली व त्याची प्राणजोत मालवली. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. अचानक जाण्याने निरवडे गावावर शोककळा पसरली आहे

