◼️खेर्डीत २४ मे पासून लसीकरण केंद्र सुरू होणार ; अभिजित खताते
◾आमदार शेखर निकमांसह अनेकांचे सहकार्य..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२२ :- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत खेर्डी मध्ये आमच्या सातत्याच्या पाठपुराव्याने २४ मे रोजी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू होत असल्याची महत्वाची माहिती ग्रामपंचायत सदस्य अभिजित खताते यांनी दिली आहे.यासाठी ग्रामपंचयत सदस्य बाबूशेठ शिर्के,विनोद भुरण,बाळा दाते आणि मी स्वतः तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव याना खेर्डीच्या ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन २८ एप्रिल रोजी सर्वात प्रथम निवेदन दिले होते.त्यानंतर आमदार शेखर निकम यांच्याकडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला आहे.आमदार शेखर निकम यांनी अतिशय कार्यकुशलतेनी पालकमंत्री अनिल परब,ना उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा , जिल्हा वैद्यकीय अधिकारी संगमित्रा फुले यांच्याकडे संपर्क साधून पत्रव्यवहार करून आमची मागणी पूर्ण करून दिली असून २४ मे ला खेर्डीत लसीकरण केंद्र सुरू होत आहे.यामुळे तमाम खेर्डीवासीयांना लस मिळण्यास सुलभता होऊन गैरसोय दूर होणार आहे.
या लसीकरण केंद्रासाठी दोनच दिवसांपूर्वी खेर्डी ग्रामपंचायत मध्ये तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सर्व सदस्य,पं. स.सदस्य,जि. प.सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ संतोष दाभोळकर, डॉ अजित दाभोळकर, डॉ केतकर डॉ उतेकर खेर्डीतील सर्व डॉक्टर्स यांची मिटिंग आयोजित केली होती.यावेळी खेर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असणारी जागा देखील ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.यासाठी आवश्यक माहिती डॉ मयेकर यांनी दिली आहे.अशी माहिती देखील अभिजित खताते यांनी दिली आहे.२४ मे ला खेर्डीत सुरू होणाऱ्या लसीकरण केंद्रामुळे सर्वांचीच गैरसोय दूर होणार असल्याने खेर्डीवासीयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

