आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केली नुकसानग्रस्त भागाची पहाणी..

◾त्यानंतर घेतला सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात याबाबत आढावा..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-२२ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी सहकार मंत्री बाळा पाटील यांनी आज केली आहे. नुकसानग्रस्त भागाची पहाणी केल्यानंतर मंत्री पाटील यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात येत याबाबत आढावा घेतला. यावेळी नुकसानीचे पंचनामे सुरू असून येत्या काही दिवसांत हे पंचनामे पुर्ण होतील आणि त्यानंतर लगेचच नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करू अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नारळ, सुपारी, आंबा, काजु या पिकांचही नुकसान झाले असून, बागायतदारांना देखील पंचनामे करून मदत पोहोचवली जाणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा लांबलेल्या निवडणूकीबाबत विचारणा केली असता. कोव्हीडमुळे सद्य स्थितीत असलेल्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात काही निवडणुका घेतल्यानंतर कोरोनान मतदारांचा मृत्यू झाल्याच समोर आले. तर या दरम्यान कोरोनाची बाधा मतदारांना झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!