आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾जैवविधता दिनानिमित्त आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रोपलागवड करून करण्यात आला जैवविविधता दिन साजरा..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी, दि-२२ :- जैवविधता दिनानिमित्त आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ देवसु येथे वनविश्राम गृह देवसु च्या आवारात रोपलागवड करून जैवविविधता दिन साजरा करण्यात आला.

यामध्ये प्रामुख्याने माकड फळ (लकूचा) या दुर्मिळ झाडाची लागवड करण्यात आली.

यावेळी नव्याने नियुक्त झालेले देवसु वनपाल सदानंद परब,वेर्ले वनरक्षक बाबासाहेब ढेकळे , वनरक्षक देवसु गोरख ढेरे,हेमराज बागुल वनरक्षक केसरी , रवींद्र शिखरे वनरक्षक सांगेली, शितल पाटील वनरक्षक शिरशिंगे,तसेच गावातील ग्रामस्थ महेंद्र रेमुळकर आदी उपस्थित होते.

आर्टोकारपस लाकुचा, ज्याला माकड फळ किंवा मँक जॅक किंवा बाहाल, बडहार किंवा देवा किंवा बोहोत किंवा हेरीकोकथॉन्ग आणि ईशान्य भारतातील थडॉ-कुकी भाषेतील ‘टाट’ देखील म्हणतात, मोरासी कुटुंबातील उष्णदेशीय सदाहरित वृक्ष आहे. हे संपूर्ण भारतीय उपखंड आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये वितरीत केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!