आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बांदा येथे शिवसेनेच्या वतीने तौक्ते चक्रीवादळामुळे घर, मांगर,गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना सिमेंट पत्र्यांचे वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-२२ :- बांदा येथे शिवसेनेच्या वतीने तौक्ते चक्रीवादळामुळे घर, मांगर,गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले.आ.दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत,खा.विनायक राऊत, जिल्हाप्रमुख आ.वैभव नाईक,संजय पडते यांच्या माध्यमातून ही मदत आज देण्यात आली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर,ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, उपतालुकप्रमुख भैया गोवेकर,ओंकार नाडकर्णी,राकेश वाळके, गिरीश नाटेकर,ज्ञानेश्वर येडवे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना साईप्रसाद काणेकर यांनी आ.दीपक केसरकर हे जनतेच्या मनातील आमदार आहेत.त्यांच्या माध्यमातून येथील नुकसानग्रस्तना छोटीशी मदत करण्याचा हा प्रयत्न असून मतदार संघात ही मदत करण्यात येत असून डिंगणे,गाळेल, डोंगरपाल या भागातील लोकांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!