आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾मराठ्यांच्या विरोधात बोलणारे जे कोण असतील त्यांना सिंधुदुर्गात प्रवेश बंदी..

◾सुहास सावंतांचा इशारा ; बहुजनवादाची पुरे झाली आता फक्त मराठावादाची भूमिका..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ, दि २२:- मराठा समाजाच्या विरोधात आज जो कोणी भूमिका घेईल, त्याला यापुढे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवू देणार नाही. तर त्याला त्याच ताकदीने विरोध केला जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे नेते जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांनी मांडली आहे. दरम्यान कालपर्यंत आम्ही बहुजन वादाची भूमिका घेवून चालत होतो, मात्र आता फक्त मराठा वादाची भूमिका घेवून चालणार आहे. त्यामुळे त्याला कोण विरोध करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, मंत्रीपदाची शप्पथ घेतलेल्या विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या विरोधात आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे काल आम्ही कुडाळ येथे निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. मात्र आमचे आंदोलन असल्याने संबधित मंत्री या ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे आम्ही ओरोस येथे जावून आंदोलन केले. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडुन आम्हाला ताब्यात घेण्यात आले, कारवाई करण्यात आली, परंतू यापुढे आमची भूमिका आक्रमक राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!