◾जखमी तरुणाला बबली राणे यांचा आधार..
◾उपचारासाठी केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२२ :- आठ दिवसापूर्वी ओसरगाव टोल नाका येथे तरुण पायाला जखमी झालेल्या अवस्थेत ओसरगावचे गावचे माजी उपसरपंच बबली राणे यांना आढळला. त्यांनी आपले नातेवाईक नसल्याचे सांगितले त्यामुळे तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर बबली राणे व सहकारी रुपेश माजगावकर यांच्यासह इतरांनी या तरूणाला आधार दिला व नंतर याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले.

