आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾पानोसेवाडीकडे जाणार्‍या मार्गावरील  साकवाचा अर्ध्याहुन अधिक भाग कोसळला..

 

◾आठ दिवसात साकव ची  दुरूस्तीबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर प्रखर आंदोलन ; संतप्त ग्रामस्थ

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२१ :- शेर्ले पानोसेवाडीकडे जाणार्‍या मार्गावरील  साकवाचा अर्ध्याहुन अधिक भाग कोसळला. त्यामुळे पानोसेवाडीतील ग्रामस्थांचा मुख्य मार्ग धोकादायक बनला.   मान्सुन पावसाळा सुरु होण्यास १५ दिवसांचा अवधी आहे. त्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने साकवची  डागडुजी करावी अशी मागणी सरपंच उदय धुरी यांनी केली आहे. आठ दिवसात ठोस कार्यवाही न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा पानोसेवाडी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

शेर्ले – पानोसेवाडी अतिदुर्गम भागात असून या वाडीतील ग्रामस्थांना मुख्य मार्गावर येण्यासाठी केवळ एकच मातीचा मार्ग आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी येथील ओहोळावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा सावक  बांधण्यात आला होता. सदर साकव हा  काम निकृष्ट झाल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. अखेर रविवारी झालेल्या  तोक्ते वादळाच्या तडाख्यात या साकवाचा   अर्ध्याहून अधिक भाग कोसळला.

या कोसळलेल्या साकवा्ची  पाहणी सरपंच उदय धुरी यांनी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. सद्य‍ा सावकची स्थीती कधीही कोसळेल अशा  अवस्थेत आहे.  स‍ाकव दुरूस्तीसाठी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्याचे आश्वासन सरपंच धुरी यांनी दिले. आठ दिवसात साकव ची  दुरूस्तीबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!