आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

◾म्हापण चव्हाणवाडीच्या मदतीला धावून आले पंढरपूरच्या विठोबाचे दुत..

 

◾तब्बल 8 दिवसांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज आली म्हापण चव्हणवाडीत लाईट..

◾चव्हाणवाडीतील युवकांनी श्रमदान करत केली वीज वितरण कर्मचाऱ्यांना सहकार्य..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-२१ :- तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने संपुर्ण जिल्ह्याभर विद्युत खांब कोसळून विद्युत प्रवाह ठीकठिकाणी खंडित झाला आहे. या वादळाने जिल्यात विद्युत खांब एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुटून पडलेत की जिल्ह्यातील वीज वितरण कर्मचारी विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी कमी पडत आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातील वीज वितरण कर्मचारी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यातीलच एक टीम थेट पंढरपूरहून कुडाळ वीज वितरण कार्यालयात काल रात्री दाखल झाली व तीच टीम आज म्हापण चव्हाणवाडी येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सकाळी 10 च्या सुमारास दाखल झाली या टीम मध्ये रवि तूपसवंदर, सागर गोसावी, गणेश आमराळे, नवनाथ गोरे, अक्षय तूपसोंदर, पांडू पाटोळे हे वीज वितरण कर्मचारी सामील होते. सलग आठ दिवस अंधारात काढणाऱ्या म्हापण चव्हाणवाडीतील ग्रामस्थांना हे कर्मचारी म्हणजे पंढरपूरच्या विठोबाने पाठवलेले देवदूतच आहेत. पंढरपूरहून आलेल्या या वीज वितरण कर्मचाऱ्यांना म्हापण चव्हाणवाडीतील युवकांनी श्रमदान करुन मोलाच सहकार्य केलेच पण त्याच बरोबर त्यांच्या जेवण, नाष्ट्याचिही इतंभुत सोय या युवकांनी करत आपुलकी व आपलेपणा दाखवला. आपल्याकडे एखादा पाहुणा आल्यावर जशी त्याला प्रेमाची व आपुलकीची वागणूक दिली जाते तशीच वागणूक या कर्मचाऱ्यांना म्हापण येथे मिळाली त्यामुळे हे परजिल्यातून आलेले कर्मचारी सुध्दा सुखावले व आपली कामाची वेळ संपून गेली तरी उशिरापर्यंत काम करत अखेर चव्हाणवाडीतील वीज पुरवठा सुरळीत करूनच काम थांबवले. उद्यासाठी किरकोळ काम बाकी आहे त्यामुळे हे वीज वितरण कर्मचारी आज म्हापण येथेच वास्तव्याला आहेत.
आठ दिवसांनंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी म्हापण चव्हाणवाडीतील ग्रा. स. गुरूप्रसाद चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, प्रशांत चव्हाण, सुदेश किनावडेकर, नागेश म्हापणकर, सचिन चव्हाण, देवदास चव्हाण, महेश दाभोलकर, उमेश कोरगावकर, राकेश चव्हाण, सुरज म्हापणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे म्हापण उपसरपंच अशोक पाटकर व कुडाळ वीज वितरण कार्यालय अभियंता थोरात मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!