आणखीकोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾ तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी व मच्छीमारांना ठोस आश्वासन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : देवगड

🎴देवगड, दि-२० :- तोक्ते चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज सिंधदुर्ग जिल्हा कॉँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी प्रत्यक्ष देवगड बंदरावर जाऊन जागोजागी झालेल्या नुकसानाची पाहणी व मच्छीमारांना बरोबर संवाद साधला तद्नंतर देवगड मच्छीमार सोसायटी च्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या नुकसानाबद्दल त्यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा व भावना समजून घेतल्या व सर्व मच्छिमार बांधवांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे ठोस आश्वासन दिले .त्यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार व बंदर अधिकाऱ्यांसोबत चर्चा व आढावा घेऊन सर्व पंचनामे लवकरात लवकर सादर करावे त्याचबरोबर मृत्यू झालेल्या व्यक्तींची लवकरात लवकर पंचनामे करून कागदपत्र पूर्तता करण्यास त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य करावे असे सांगितले .त्याचबरोबर माननीय जिल्हाध्यक्ष यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाई पटोले यांचा संभाव्य दौरा होण्याची शक्यता आहे असे वर्तविले . या वेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत तालुकाध्यक्ष उल्हास मंचेकर सिंधुदुर्ग युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर तालुका सरचिटणीस सल्लाउद्दीन सोलकर प्रदेश महिला प्रतिनिधी सुगंधा साटम सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी सूरज घाडी युवक तालुका अध्यक्ष देवगड सुरेश देवगडकर व खलिद बगदादी जिल्हा काँग्रेस सदस्य व इतर देवगड काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!