आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

◾तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे व जिल्हा कार्याध्यक्ष विलासभाई गावडे यांचेकडून वेंगुर्ला येथे प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा घेतला आढावा..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-२० :- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे व जिल्हा कार्याध्यक्ष विलासभाई गावडे यांनी सागरेश्वर, नवाबाग,वेंगुर्ला शहर तसेच इतर नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला व नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीतजास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांची भेट घेऊन तालुक्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या पहाणी दौ-यास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, तालुका अध्यक्ष विधाता सावंत,शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, उभादांडा उपसरपंच केळुसकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!