◾वीज वितरण कंपनीच्या लाईनवर पडलेली झाडे दूर करून वीज वितरण कंपनीचे पोल उभे करून लाईन पूर्ववत करण्यात आली. .
◾सावंतवाडी शहरात जुना बाजार परिसरात नगरसेवक सुरेंद्र बांदेकर व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांनंतर लाईट पूर्वरत स्थितित..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२० :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे सावंतवाडी शहरातील जुना बाजार, शिरोडा नाका, हेरेकर ग्राऊंड अशा भागांमध्ये वृक्ष घरावर आणि विज लाईन वर पडून मोठे नुकसान झाले होते. गेल्या तीन दिवसापासून नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांच्यासह नगरपालीका कर्मचारी वावरत होते आज वीजपुरवठा सुरळीत होऊन झाडे देखील दूर करण्यात यश मिळाले आहे.
नगरसेवक बांदेकर हे स्वतः पुढाकार घेऊन प्रभागांमध्ये काम करत होते. सावंतवाडी शहरातील जुना बाजार मध्ये ५ वीज पोल, शिरोडा नाका येथे मेन लाईनवर तीन पोल, मेन लाईनवर झाडे उन्मळून पडली होती तसेच काही घरावर देखील झाडे पडली होती ही झाडे दूर करण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी देखील पुढाकार घेतला.
नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी देखील यामध्ये गेले तीन दिवस सहभाग दर्शवला. सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत झाडे दूर करून विजेचे पोल उभे करणे वाहिनी सुरू करण्यापर्यंत तीन दिवसाचा कालावधी लागला असे नगरसेवक बांदेकर म्हणाले. नगरसेवक बांदेकर यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी श्रीमती नाडकर्णी, दिपक म्हापसेकर, मोहन कांबळे, श्री. आंबेकर, श्री. सावंत यांच्यासह लाईनमन श्री. जोशी , श्री.शुभम असे आणि अन्य कर्मचारी व प्रभागांमधील काही नागरिक यासाठी वावरत होते.
नगरसेवक नव्हे तर सामान्य माणूस म्हणून गेले तीन दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झाडे बाजूला करण्यासाठी सर्वांबरोबर वावरलो असे नगरसेवक बांदेकर यांनी बोलताना सांगितले.
गेल्या तीन दिवसानंतर सावंतवाडी शहरातील वीज वितरण कंपनीच्या लाईनवर पडलेली झाडे दूर करून वीज वितरण कंपनीचे पोल उभे करून लाईन पूर्ववत करण्यात आली असल्याचे नगरसेवक बांदेकर यांनी बोलताना सांगितले.

