◾नेटवर्क मिळत नाही याकरिता ऑफलाइन पद्धतीने धान्य पुरवठा करावा ; माडखोल गावातून तहसीलदारांकडे मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२०:- गेल्या काही दिवसांमध्ये चक्रीवादळामुळे सर्वत्र अतिवृष्टी होवून वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाल्यामुळे गावागावात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे तसेच इंटरनेट सेवा नसल्याने रेशनिंग धान्य दुकान वर नेटवर्क मिळत नसत नाही याकरिता ऑफलाइन पद्धतीने धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी माडखोल गावातून तहसीलदारांकडे करण्यात आली आहे .
माडखोलचे माजी सरपंच संजय लाड, सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष जॅकी डिसोजा, राजकुमार राऊळ, राजेंद्र राऊळ, सूर्यकांत राऊळ, रोहित गोटाड, संतोष राऊळ, अविनाश ठाकूर, विजय ठाकूर तसेच अनेक मान्यवरांनी तहसीलदारांकडे रेशनिंग धान्य ऑफलाइन पद्धतीने द्यावे अशी मागणी केली आहे.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी करण्यात आली तसेच धान्य वितरणाच्या वेळा बदलण्यात आल्या आणि वाहतूकही बंद असल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पायी चालत धान्य दुकानावर यावे लागते. धान्य दुकानावर आल्यानंतर इंटरनेट सेवा नसल्याने धान्य मिळत नाही. त्याकरिता रेशनिंग धान्य दुकानावर ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जरूर तर धान्य पुरवठा पत्रिका, आधार कार्ड नोंदवून घ्यावेत असेदेखील सुचविण्यात आले आहे.

