आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾त्या अज्ञात चारचाकी गाडीचा सीसीटीव्ही फुटेज द्वारे शोध घेऊन कारवाई करावी ; माडखोल सरपंच संजय लाड

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.२० :- माडखोल मेटवाडी येथे एका अपघात वासुदेव वरक कुटूंब जखमी झाले.या कुटुंबांची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे तसेच या कुटुंबाला ठोकरलेल्या वाहनाचा सीसीटीव्ही फुटेज द्वारे शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी माडखोल गावचे माजी सरपंच संजय लाड यांनी पोलिसांकडे केली आहे.

सावंतवाडी पोलीसांना संजय लाड, राजकुमार राऊळ, सूर्यकांत राऊळ, राजन राऊळ यांनी निवेदन दिले आहे. माडखोल मेटवाडी येथे दि.१३ मे च्या मध्यरात्री वासुदेव वरक व त्यांची पत्नी वासंती तसेच मुलगी सोनाली असे सगळे ज्युपीटर या मालकीच्या वाहनाने माडखोल बामणादेवी येथे येत असताना वेंगुर्ले बेळगाव जाणाऱ्या रोडवर माडखोल मेटवाडी येथे अपघात झाला एका अज्ञात चार चाकी गाडीच्या चालकाने जुपिटरला ठोकर दिल्याने हे कुटुंब जखमी झाले. ठोकर देऊन वाहन पसार झाले याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे असे संजय लाड यांनी म्हटले आहे.

या अपघातात तीनही व्यक्तींना दुखापत झाली असून बांबुळी गोवा येथे एक व्यक्ती उपचार घेत आहे हे कुटुंब गरीब असल्याने त्यांना आवश्यक उपचार करता येत नाही मुलगी सोनाली हि गोवा येथे उपचार घेत आहे असे या निवेदनात म्हटले आहे. या अपघातामुळे पती, पत्नी व मुलगी जखमी झाली असून चुलत भाऊ वरक यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली पती-पत्नी दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या दोन्ही मुली ह्या दिवांग्य आहेत आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्यामुळे त्यांना आरोग्य उपचार आणि आर्थिक मदतीची गरज आहे.

या दोन्ही मुली दिव्यांग असल्याने त्यांच्यात कमवता कोणीही नाही या अपघातात सीसीटीव्ही द्वारे वाहनाचा शोध घेतला जावा आणि ज्यांनी ठोकरले, त्यांना पकडावे अशी मागणी संजय लाड यांनी करून गरीब कुटुंबाला पोलिसांनी लवकरात लवकर न्याय द्यावा असे देखील या निवेदनामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!