◾शिवसैनिकांच्या माध्यमातून चक्रीवादळग्रस्त नुकसान झालेल्या ग्रामस्थाना पत्रे वाटप..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-२० :- वैभववाडी तालुक्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काल पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी तालुक्याची आढावा बैठक घेऊन शासनाच्या मदतीची वाट न पाहता आपल्या शिवसेना पक्षामार्फत नुकसानग्रस्त भागात तात्काळ मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार वैभववाडी तालुक्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सिमेंट पत्रे आणि गावागावातील नळपाणी योजनेतून वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी 20 केव्ही चे 3 जनरेटर वैभववाडी तालुक्यातील 3 जि.प.मतदारसंघासाठी शिवसेनेच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी देण्यात आले. 3 जनरेटर तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. तर सिमेंट पत्रे शिवसैनिकांच्या माध्यमातून चक्रीवादळग्रस्त नुकसान झालेल्या ग्रामस्थाना दिले जाणार आहेत. यावेळी शिवसेना नेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अतुल रावराणे, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांनी आपल्या बैठकीत सांगितल्या प्रमाणे बुधवारी सायंकाळ पर्यंत पत्रे व कौले असे इतर साहित्य घेऊन ट्रक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.गुरुवारी सकाळी वैभववाडी तालुक्यासाठी सिमेंट पत्रे शिवसेना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. शिवाय वैभववाडी तालुक्यातील तिन्ही जि.प. मतदार संघासाठी २० के.व्हि चे तिन जनरेटर शिवसेना पक्षामार्फत वैभववाडी चे तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. चक्रीवादळामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अद्याप विज पुरवठा खंडित असल्याने नळपाणी योजना ठप्प आहे. परिणामी नागरिकांची पाण्याची गैरसोय टाळावी या उद्देशाने हे तिन्ही जनरेटर जि.प. मतदार संघात फिरते राहणार आहेत यावर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व महसूल प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत यांनी आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वैभववाडी तालुकावासियांना हि मदत केली आहे. या निमित्ताने ८० % समाजकारण व २० % राजकारण ही शिवसेना प्रमुखांची शिकवण शिवसेनेच्या वतीने कृतीत उतरवील्याचे दिसून येत आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, वैभववाडी शहर अध्यक्ष प्रदीप रावराणे, रणजित तावडे आदी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

