आणखीमहाराष्ट्र

◾धर्मांधांनी देशात गृहयुद्ध चालू केले आहे ; मात्र मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्या तथाकथित ‘सेक्युलरिझम’च्या नावाखाली ते दाखवत नाहीत ; सुरेश चव्हाणके मुख्य संपादक , सुदर्शन न्यूज चॅनेल

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२० :- हरयाणातील ‘मेवात’मध्येच अल्पसंख्यांक हिंदूंवर धर्मांधांनी अत्याचार केले आहेत, असे नाही; तर देशभरात अशा अनेक घटना घडत आहेत. काही वर्षांपूर्वी ‘सुदर्शन चॅनल’वर ‘मिनी पाकिस्तान’ नावाचा कार्यक्रम दाखवला; त्यात आम्ही भारतातील अशी एक हजार ठिकाणे दाखवली होती. त्यातील 9 प्रभाग असे आहेत की, जेथे पिझ्झा जात नाही; कोणतीही ऑनलाईन खरेदी घरपोच होत नाही; गुन्हेगाराला पकडायला पोलिसही जात नाहीत; पोलिसांना जायचे असेल, तर निमलष्करी दल सोबत घ्यावे लागते. दिल्लीलाही धर्मांधांनी चारही बाजूंनी घेरलेले आहे. दिल्लीतील सिलमपूरमधील परिस्थिती ‘मेवात’पेक्षा गंभीर आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे 200 धर्मांधांनी यादव समाजातील लोकांवर हिंसक आक्रमण केले. त्यात महिलांवर बलात्कार करण्यापासून ते त्यांच्या हत्येपर्यंतचे सर्व प्रयत्न केले गेले. माध्यमांना हा विषय जातीय न वाटता केवळ कायदा-सुव्यवस्थेचा वाटतो; मात्र हे एक गृहयुद्धच असून ते देशात अनेक ठिकाणी चालू झाले आहे; पण मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्या ‘सेक्युलरिझम’च्या नावाखाली हे दाखवत नाहीत, *असा घणाघात ‘सुदर्शन चॅनेल’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केला. ते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘सेक्युलरवादाच्या नावावर हिंदुविरोधी पत्रकारिता’ या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांद्वारे 5,400 हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.*

 

या वेळी *’ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहूल रौशन म्हणाले की,* दिल्ली दंगलीच्या वेळी धर्मांधांनी प्रथम हिंसाचार चालू करून बस जाळली. या घटना मुख्य प्रवाहातील माध्यमांनी हेतुपुरस्सर दाखवल्या नाहीत; मात्र आम्ही या घटना देशासमोर मांडल्या. त्यामुळे भाजप नेते श्री. कपिल मिश्रा यांना मुख्य आरोपी बनवण्याचा त्यांचा कट फसला. ‘NRC, CAA लागू झाल्यावर मुसलमानांना देशाबाहेर काढले जाईल’, असे सांगून दंगली घडवल्या जात असल्याचेही माध्यमांनी दाखवले नाही.

 

या वेळी *बेंगळुरू येथील लेखक आणि स्तंभलेखक श्री. आभास मलदहियार म्हणाले की,* कम्युनिस्ट पत्रकारांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्यांचा उद्देश हिंदुविरोधी नसून भारतविरोधी आहे. त्यासाठी ते प्रथम हिंदु समाजाला लक्ष्य करून कमकुवत करत आहेत. भारतविरोधी बातम्या दाखवत आहेत. एकदा का हिंदु कमकुवत झाला की, देशावर स्वतःची विचारधारा प्रस्थापित करता येईल.

 

या वेळी *’सनातन प्रभात’ नियतकालिकांचे सहसंपादक श्री. चेतन राजहंस म्हणाले की,* ‘कुंभमेळ्यामुळे देशभरात कोरोना पसरला’, असा अपप्रचार हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांनी केला; मात्र उत्तराखंड राज्यांत 31 मार्चपर्यंत केवळ 292 जण कोरोना संक्रमित होते. तर एप्रिल महिन्याच्या शेवटीही हे प्रमाण अल्प होते. दुसरीकडे रमजान ईद सणाच्या वेळी देशभरात अनेक ठिकाणी मुसलमानांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. त्याविषयी माध्यमांनी बातम्या का दाखवल्या नाहीत ? समाजाला सत्य सांगायला हवे. यासाठी देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन संघटित झाले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!