◾जगाच्या नकाशावर असलेले आंबोली पर्यटक स्थळ गेले सात दिवस आहे अंधारात..
◾पहिल्या पावसाच्या पहिल्याच सरीत शुक्रवार ता. १४ रात्री बत्ती झाली गुल–शोधून शोधता ..शोधता सापडेना..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : चौंडू पाटील
🎴आंबोली, दि-२० :- आंबोली हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले थंड हवेचे पर्यटक स्थळ आहे , हे पर्यटक स्थळ गेले सात दिवस लाईट वीणा अंधारात आहे, त्यामुळे विद्युत वितरण कंपनी ची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
कायमस्वरूपी असलेला वायरमेन ची बदली झाली त्या जागेवर आज पर्यंत वायरमेन ची नियुक्ती करण्यात आलेली नाही, खाजगी तत्वावर चे कर्मचारी असल्यामुळे नक्की फॉल्ट कुठे आहे हे समजत नसल्याने आज सात दिवस होऊन सुद्धा आंबोलीतील काही भाग आहे अंधारात तर काही भागात आहे लाईटीचा लपा छुपी चा खेळ सुरु आहे.
ज्या कष्टकरी शेतकऱ्यांना रेटून पैसे वसुली चा तगदा लावला जातो त्या शेतकऱ्यांना राहावे लागते लाईट विना अंधारात हीच खरी शोकांतिका असल्याचे बोलले जाते,
आंबोली हे थंड हवेचे पर्यटन स्थळ असल्याने येथे विद्युत महामंडळाचे एक ऑफिस एक अनुभवी परमनंट कर्मचारी व त्याला लागणारी सुसज्ज यंत्रणा व कर्मचारी स्टाफ उपलब्ध करुन द्यावेत अशी नागरिकांची मागणी आहे.

