◾पेंडूर खरारे येथे घरावर झाडे पडल्याने घर जमीनदोस्त..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२० :- मालवण तालुक्यातील खरारे पेंडूर येथील शुद्धमती सदाशिव सावंत यांच्या राहत्या घरांवर वादळात दरम्यान आंब्याचे झाड पडून घर पूर्ण जमीनदोस्त झाले.यात नवीन सदाशिव सावंत हे जखमी झाले आहेत .तर घरातील अन्य तीघे तण बाचावले आहेत मात्र सावंत यांच्या घरातील सामान ,कपडे, जेवनाचे साहित्य पावसात भिजलेल्या ने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र
कोणतीही जीवित हानी झाली नाही. पेंडूर सरपंच तलाठी ग्रामसेवक यांनी पंचनामा केला .

