◾माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण येणार कोकण दौऱ्यावर..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-१९:- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर २१ मे रोजी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण कोकण दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये ते नुकसानीची पाहणी करणार आहेत, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

