आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ओवळीये माजी सरपंच बळीराम सावंत यांचे निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-१९ :- ओवळीये गावचे माजी सरपंच तथा गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बळीराम यशवंत सावंत (वय६५) यांचे रविवारी १६ मे रोजी निधन झाले. ओवळीये गावचे दहा वर्षे सरपंच पद भूषविताना त्यांनी स्वतः पदरमोड करून गावात अनेक विकास कामे केली होती. गावच्या शैक्षणिक व सामाजिक विकासातही त्यांचे योगदान होते. शिवसेनेचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. शिवसेनेचे सावंतवाडी उपतालुकाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. भारतीय सैन्य दलातील प्रयाग सावंत व सत्यवान सावंत यांचे ते वडील होत तर पुंडलिक सावंत यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, सुना, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!